27 Jul 2011
by Ruhi
in food, recipes, vegetable
Tags: भरली भेंडी, मराठी पद्धतीची भरली भेंडी भाजी, मराठी भरली भेंडी भाजी, मराठी भाजी, bharli bhendi, bharli bhendi maharashtrian style, bharli bhendi suki, bharli bhendi veg, marathi bharli bhendi, stuffed ladies finger, stuffed okra
साहित्य-
१०-१२ भेंडी धुवून, पुसून घ्यावीत. देठ आणि टोकं कापून टाकावीत व मधे उभी चीर द्यावी.
६-७ पाकळ्या लसूण ठेचून घ्यावी.
तेल (फोडणीसाठी) १ मोठा चमचा.
भरण्यासाठीचा मसाला-
१. बेसन १ मोठा चमचा
२. शेंगदाण्याचे कुट २ मोठा चमचा
३. हिंग (चिमटीभर)
४. हळद १/२ छोटा चमचा
५. लाल मिरची पावडर २ छोटा चमचा
६. मिठ (चवीनुसार)
कृती-
१. सगळे साहित्य एकत्र करुन मसाला तयार करुन घ्यावा.
२. चीर दिलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरुन घ्यावा. शिल्लक मसाला भेंड्यांना बाहेरुन सुद्धा लावावा.
३. तेलाची फोडणी करुन त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात.
४. त्यात भरलेली भेंडी नीट लावावीत. शिल्लक मसाला घालावा.
५. झाकण ठेवून, मंद गॅसवर शिजवावीत.
६. पाणी अजिबात घालू नये. थोडी शिजली की, झाकण काढून, पुन्हा थोडे तेल सोडून, खरपूस, चुरचुरीत होईपर्यंत हलवत राहावे.
७. वरुन कोथिंबीर घालून आणि भाजी वाढायला घ्यावी.
Like this:
Like Loading...
13 Jun 2011
by Ruhi
in food, Non-veg, recipes
Tags: कोंबडी, कोंबडी रस्सा, रस्सा, chicken, chicken gravy style, chicken recipe, gaavaran kombadi rassa, gavaraan kombadi, Kombadi, kombadi rassa, marathi chicken, marathi chicken recipe, marathi kombadi rassa
पुर्व तयारी -
कोंबडीच्या फोडी स्वच्छ धूवून साफ करुन घ्याव्यात. गांवठी कोंबडी मिळाल्यास उत्तम. नाहीतर ‘ब्रॉईलर’ सुद्धा चालेल.
त्यांना हळद, आले-लसूण ची गोळी (पेस्ट) व १/२ लिंबू पिळून, नीट लावून किमान २ तास मुरण्यास ठेवावे.
वाटण साहित्य – १ वाटी किसलेले सुके खोबरे, ४-५ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.
रस्सा साहित्य -
१ किलो कोंबडीच्या मध्यम आकाराच्या फोडी
२ चमचे आले-लसूण ची गोळी
१/२ लिंबू
१ मोठा कांदा (बारीक चिरुन)
२ तमाल पत्र
२ चमचे तेल (तेबलस्पून)
३ टि.स्पून लाल तिखट
२ टि.स्पून गरम मसाला
मीठ (चवीनुसार)
१ टि.स्पून साजुक तूप
४-५ वाट्या गरम पाणी
कृती -
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले लाल भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण पाकळ्या तेलावर खरपूस लालसर परतून घेणे. कांदा काळपट करणे पण करपवू नये. थोडा वेळ गार करुन मग मिक्सरला वाटण करुन घेणे. हे वाटण व करताना पाणी न घातल्यास जास्त दिवस फ्रिजमधे टिकते.
रस्सा -
१. तेल गरम करून त्यामधे तमाल पत्र आणि चिरलेला कांदा घालवा व मंद गॅसवर कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतावा.
२. त्यात लाल तिखट, गरम मसाला घालावा व एकत्र हलवून घ्यावे.
३. आधी मुरवून ठेवलेले चिकन घालावे. पुन्हा नीट एकत्र करुन घ्यावे. थोडा वेळ झाकण ठेवून चुरचुरण्याचा आवाज येईपर्यंत १०-१५ मिनिटे शिजवावे.
४. हळूहळू गरम पाणी घालावे.
५. फोडी थोड्या शिजत आल्या की वाटण घालावे.
६. हवे असल्यास आपापल्या आवडीनुसार – कांदा-लसूण लाल चटणी/चिकन मसाला/कशमिरी लाल मसाला घालवा. नाही घातला तरी उत्तम.
७. शेवटी मीठ घालावे.
८. चिकन पूर्ण शिजले की वरुन साजुक तूप घालावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा. झाकण थोडा वेळ तसेच बंद ठेवावे.
कोंबडी रस्सा तयार! माझ्या गावी सिंधुदुर्गात याच्या बरोबर ‘आंबोळ्या’ करतात. माझ्या घरी ‘आंबोळ्या’ व ‘तांदळाचे वडे’ केले जातात. तर घाटावर ‘भाकरी’ केली जाते. बरोबर यातले काहीच नसले तर चपाती किंवा भात असतोच, कशा बरोबरही खा आणि मजा लुटा!
मी (संपूर्ण शाकाहारी असल्यामुळे) लुटत नाही तो भाग निराळा. पण मी माझ्या नवर्यासाठी करायला लागलेय (वाचा – शिकलेय)
Like this:
Like Loading...
09 Jun 2011
by Ruhi
in drinks, fasting recipes, food, recipes
Tags: उपवास स्पेशल, उपवास स्पेशल - रताळ्याचे पियुष, रताळ्याचे पियुष, piyush, ratala piyush, ratalyache piyush, sweet potato shake, thick shake
उपवास स्पेशल – रताळ्याचे पियुष
२-३ लाल रताळी (मध्यम आकाराची)
२ ग्लास गोड ताक
१/२ वाटी साखर
१ चमचा वेलची पावडर
केशर (थोडेसे)
१/२ चिमटी मीठ
कृती -
थोडे मीठ घालून रताळी कुकरमधे छान उकडून घ्यावी.
उकडलेली रताळी गार करुन, साल सोलून, हातने कुसकरुन घ्यावी.
मिक्सरला कुसकरलेली रताळी, ताक, साखर, वेलची पावडर, केशर, मीठ एकत्र घालून मिल्क-शेक सारखे घट्ट पियुष करावे. हवे असल्यास अजून थोडी साखर घालावी.
फ्रिजमधे ठंड करुन गार प्यावे.
उपवासासाठी हे वेगळे आणि उत्तम पेय आहे. लहान-थोर सगळे अगदी आवडीने पितात.

Like this:
Like Loading...
06 Jun 2011
by Ruhi
in food, recipes, vegetable
Tags: भरली वांगी, भरली वांगी (सुकी), bharli vangi, bharli vangi suki, egg plant, egg plant veg, stuffed egg plant
साहित्य -

वाटणासाठी – १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, २ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.
५-६ छोटी वांगी
१ बटाटा (हवे असल्यास)
१ कांदा (मोठा) बारीक चिरुन
२ वाटी कोथिंबीर
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
२ चमचे गरम मसाला
मिठ, हिंग, तेल, मोहरी.
कृती -
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण पाकळ्या तेलावर खरपूस लालसर परतून घेणे. कांदा काळपट करणे पण करपवू नये. थोडा वेळ गार करुन मग मिक्सरला वाटण करुन घेणे. हे वाटण करताना पाणी न घातल्यास जास्त दिवस फ्रिजमधे टिकते.
भाजी -
वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत. देठ थोडे तासून घ्यावेत. पूर्ण कापू नयेत. वांग्यांना खालून आडवी-उभी चिर द्यावी. + चिन्हा प्रमाणे. म्हणजे त्यात सारण नीट भरता येते. फोडी करु नयेत.
बटाटा सोलून, उभ्या फोडी करुन घेणे.
सारणसाठी बारीक चिरलेला कांदा, वाटण, कापलेली कोथिंबीर, हळद, मिठ, तिखट, गरम मसाला एकत्र करुन घेणे.
चिरलेल्या वांग्यांमधे हे सारण भरावे.
कढईमधे थोडे जास्त तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग ची फोडणी करणे. बटाटा फोडी घालणे. अलगद सारण भरलेली वांगी ठेवणे. पाव वाटीहून कमी पाणी घालणे. आणि झाकण ठेवून मंद आचेवर, झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजविणे. ही सुकी भाजी असल्यामुळे पाणी घालू नये. अधे-मधे झाकण उघडून अलगद वांगी हलविणे. वाफेवर छान भाजी शिजते.
चपाती बरोबर तर ही भाजी छान लागतेच पण भाकरी सोबत तर मजा न्यारीच!!!

Like this:
Like Loading...
12 May 2011
by Ruhi
in chutney, Dosa, food, recipes
Tags: डोसे, chutney, dosa, dosa recipe, poha Dosa, recipe, recipes, red chillies chutney
Dosa(Puffed rice) & Red chillies Chutney in Marathi
Ingredients -
1. Rice – 2 cups
2. Urad Daal – 1/4 cup
3. Fenugreek (a.k.a Methi) seeds – 1 Tea spoon
4. (Thin) Puffed rice – 1 cup
5. Freshly grated coconut – 1/2 cup
Procedure -
1. Soak Rice, Urad daal and fenugreek seed together for 7-8 hours (mostly in the morning so that Dosa can be made for next morning).
2. At night, soak puffed rice in water for a minute and drain excess water from it.
3. Add these soaked puffed rice, fresh coconut to soaked rice-daal-fenugreek. Grind them together in mixer to make batter.
4. Keep to ferment for next 6-7 hours.
5. Add salt to taste and make pan cakes(dosas) from this batter in the morning.
Red chillies Chutney -
~~~~~~~~~~~~
1. Take 6-7 dry red chillies, freshly grated coconut, 2-3 garlic leaves, 1 small piece of tamarind, salt, sugar. Grind together in mixer to make paste (chutney)
2. Take small pan and add some oil and heat it
3. Add asafoetida, poppy seeds, cummin seeds and curry leaves in heated oil. Turn off gas immediately.
4. Add this to paste (chutney) made in step 1
Dosas are ready to be served along with this tasty chutney!

Like this:
Like Loading...
09 May 2011
by Ruhi
in chutney, Dosa, food, recipes
Tags: डोसे, chutney, dosa, dosa recipe, poha Dosa, recipe, recipes, red chillies chutney
डोसा (पोह्याचे) आणि लाल चटणी – इंग्लिश मध्ये
साहित्य -
१. जुने जाडे तांदुळ – २ पेले
२. उडिद डाळ – १ मुठी
३. मेथी दाणे – १ टी स्पून
४. पातळ पोहे- १ पेला
५. ओलं खोबरं – २ मुठी
कृती -
१. सकाळी तांदुळ, डाल, मेथी एकत्र ७-८ तास भिजविणे.
२. रात्री आयत्या वेळी पोहे पाण्यात भिजविणे व पिळून घेणे.
३. वरील पोहे व ओलं खोबरे घालून भिजविलेले तांदुळ-डाळ एकत्र वाटून घेणे.
३. ६-७ तास आंबवायला ठेवणे.
४. सकाळी मीठे घालून (आंबोळी सारखे थोडे जाडसर) डोसे काढणे.
लाल मिरची ची चटणी -
~~~~~~~~~~~~~~~
६-७ लाल सुक्या मिरच्या, ओले खोबरे, लसूण, आले, थोडीशी चिंच, मीठ, साखर मिक्सर वर वाटून चटणी करून घेणे.
चटणीला हिंग, मोहरी, जीरे, कढिपत्ता याची फोडणी देणे.
गरमा-गरम डोसे आणि ही चटणी… आहाहा!!! 
हे करून बघा व मला सांगा वेगळ्या प्रकारचे डोसे आवडले का?

Like this:
Like Loading...
06 Apr 2011
by Ruhi
in स्वागत, welcome
वाचकहो,
‘मेजवानी’ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत!
माझी आई ही साक्षात ‘अन्नपुर्णा’. तिच्या हातचे पाणी देखील अमृततुल्य…जेवणाचे तर विचारुच नका. त्या हातच्या चवीसाठी “अप्रतिम!” हा एकच उदगार आज पर्यंत येत आलाय, केवळ माझ्या तोंडून नव्हे तर तिने प्रेमाने खाऊ घातलेल्या प्रत्येकाकडूनच.
या साईटवर तिच्याच साध्या, सरळ आणि सोप्या अशा पाककृती आणि टिपस् लिहून संग्रह करण्याचा आणि तो खजाना तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मनसुभा आहे.
आज ‘मदर्स डे’ चा मुहुर्त साधून ह्या ब्लॉगचे उद्घाटन करते आहे.
This is for you Mom!
~ रुही
Like this:
Like Loading...