कोंबडी रस्सा

पुर्व तयारी
कोंबडीच्या फोडी स्वच्छ धूवून साफ करुन घ्याव्यात. गांवठी कोंबडी मिळाल्यास उत्तम. नाहीतर ‘ब्रॉईलर’ सुद्धा चालेल.
त्यांना हळद, आले-लसूण ची गोळी (पेस्ट) व १/२ लिंबू पिळून, नीट लावून किमान २ तास मुरण्यास ठेवावे.

वाटण साहित्य – १ वाटी किसलेले सुके खोबरे, ४-५ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.

रस्सा साहित्य
१ किलो कोंबडीच्या मध्यम आकाराच्या फोडी
२ चमचे आले-लसूण ची गोळी
१/२ लिंबू
१ मोठा कांदा (बारीक चिरुन)
२ तमाल पत्र
२ चमचे तेल (तेबलस्पून)
३ टि.स्पून लाल तिखट
२ टि.स्पून गरम मसाला
मीठ (चवीनुसार)
१ टि.स्पून साजुक तूप
४-५ वाट्या गरम पाणी
 
कृती
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले लाल भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण पाकळ्या तेलावर खरपूस लालसर परतून घेणे. कांदा काळपट करणे पण करपवू नये. थोडा वेळ गार करुन मग मिक्सरला वाटण करुन घेणे. हे वाटण व करताना पाणी न घातल्यास जास्त दिवस फ्रिजमधे टिकते.
 
रस्सा
१. तेल गरम करून त्यामधे तमाल पत्र आणि चिरलेला कांदा घालवा व मंद गॅसवर कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतावा.
२. त्यात लाल तिखट, गरम मसाला घालावा व एकत्र हलवून घ्यावे.
३. आधी मुरवून ठेवलेले चिकन घालावे. पुन्हा नीट एकत्र करुन घ्यावे. थोडा वेळ झाकण ठेवून चुरचुरण्याचा आवाज येईपर्यंत १०-१५ मिनिटे शिजवावे.
४. हळूहळू गरम पाणी घालावे.
५. फोडी थोड्या शिजत आल्या की वाटण घालावे.
६. हवे असल्यास आपापल्या आवडीनुसार – कांदा-लसूण लाल चटणी/चिकन मसाला/कशमिरी लाल मसाला घालवा. नाही घातला तरी उत्तम.
७. शेवटी मीठ घालावे.
८. चिकन पूर्ण शिजले की वरुन साजुक तूप घालावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा. झाकण थोडा वेळ तसेच बंद ठेवावे.
 
कोंबडी रस्सा तयार! माझ्या गावी सिंधुदुर्गात याच्या बरोबर ‘आंबोळ्या’ करतात. माझ्या घरी ‘आंबोळ्या’ व ‘तांदळाचे वडे’ केले जातात. तर घाटावर ‘भाकरी’ केली जाते. बरोबर यातले काहीच नसले तर चपाती किंवा भात असतोच, कशा बरोबरही खा आणि मजा लुटा!🙂
 
मी (संपूर्ण शाकाहारी असल्यामुळे) लुटत नाही तो भाग निराळा. पण मी माझ्या नवर्‍यासाठी करायला लागलेय (वाचा – शिकलेय)😉
 
Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 thoughts on “कोंबडी रस्सा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s