साहित्य:
चिकनचे boneless pieces 15-20 or paneer cubes 300 gms
२० कढीपत्त्याची पानं
२ चमचे दही
२ चमचे लिंबाचा रस
मीठ चवीप्रमाणे
Coating चे साहित्य:
१/२ वाटी तांदूळ
१०-१२ सुक्या लाल मिरच्या
१०-१२ कढीपत्त्याची पानं
१ चमचा लाल तिखट
४-५ पाकळ्या लसूण
२-३ तुकडे आलं
१/२ चमचा मीठ

कृती:
वरील coatingचे सर्व साहित्य मिक्सर ला वाटून पेस्ट करणे.एका बोल मध्ये ही पेस्ट, चिकनचे किंवा पनीरचे तुकडे, दही, लिंबाचा रस, १.५-२ चमचे मीठ घालून नीट एकत्र करणे. सगळे तुकडे नीट coat करणे. २ तास fridge मध्ये marinate करणे.
एका बोलमध्ये ४ चमचे मैदा घेऊन त्यात एक-एक तुकडा अलगद roll (all sides) करून घेणे. सगळे तुकडे ready होईपर्यंत Frying pan मध्ये तेल गरम करून घेणे. मंद गॅसवर Shallow करणे. उरलेली कढीपत्त्याची पानं Pan मध्ये टाकणे. ही पानं कुरकुरीत होतात. एक बाजू भाजली की turn करणे.
सगळ्या बाजू छान roast झाल्या की तुकडे paper napkin वर काढणे. कुरकुरीत कढीपत्त्याच्या पानांसहित गरमा-गरम serve करणे.